मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रभाग १८ मध्ये गतिरोधक टाकण्याच्या कामाला सुरुवात....
गतिरोधक टाकण्याच्या कामाला सुरुवात....

पनवेल / वार्ताहर : - 
प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कार्यक्षम मा.नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच तत्पर असतात.प्रभागातील नागरिकांना त्रास होऊ नये आणि त्यांच्या समस्या लवकरात लवकर कशा सोडवता येतील याकडे नेहमी लक्ष ठेवून असतात.असाच एक विषय होता की ज्याचा विक्रांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावला आणि तो म्हणजे प्रभागातील महत्वाच्या रस्त्यांवर गतिरोधक असण्याचा विषय प्रभागात आता जवळ जवळ सर्व महत्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे आणि काही राहिले आहेत.
नवीन झालेल्या रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने आणि काही ठिकाणी गतिरोधकांची परिस्थिती चांगली नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक वेगाने वाहने चालवत होते त्यामुळे छोट्या मोठ्या दुर्घटनांचे सत्र सुरूच होते.या विषयावर वेळीच लक्ष घालून व नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महापालिकेशी पत्र व्यवहार करून तसेच स्मरण पत्र देऊन सातत्याने पाठपुरावा केला.याची फलश्रुती प्रभाग १८ मधील महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे.कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने गतिरोधक टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image