पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..

सायन्स विभागाचा निकाल १००%, कॉमर्सचा ९८.०२% तर आर्ट्स चा निकाल ९२.८५% 


पनवेल दि.२७ (संजय कदम) : 
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी HSC परीक्षेत दिमाखदार यश मिळवले आहे. याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज कॉमर्सचा निकाल ९१.३०% तर आर्ट्स चा निकाल ७७.७७% लागला. तर पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचा सायन्स विभागाचा निकाल १००% तर कॉमर्सचा निकाल ९८.०२% व आर्ट्स चा निकाल ९२.८५% लागला
                याकुब बेग जुनियर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान शेख नमरा अस्लम या विद्यार्थिनीने ८३.१७ % गुण मिळवून मिळवला. शेख नसरीन शब्बीर ही विद्यार्थिनी ७६.१३% गुण मिळवून द्वितीय तर शेख जारा रफिक ही विद्यार्थिनी ७४.१७% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आर्ट्स शाखेमध्ये कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान सादिया परवीन मुतीउर रेहमान या विद्यार्थिनीने ७२% गुण मिळवून मिळवला. कर्जीकर बरीरा रफिक ही विद्यार्थिनी ६५% गुण मिळवून द्वितीय तर खान अक्सा सुलेमान ही विद्यार्थिनी ६४.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान ढेपे युसुफ शाहीद या विद्यार्थ्याने ९२.१७ % गुण मिळवून मिळवला. सबा परवीन करम अली ही विद्यार्थिनी ८९% गुण मिळवून द्वितीय तर गोलंदाज आरफा असिफ ही विद्यार्थिनी ८६% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आर्ट्स शाखेमध्ये कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान खान जोया अब्दुल रौफ या विद्यार्थिनीने ७६.१७% गुण मिळवून मिळवला. पावले दानिया शाहनवाझ ही विद्यार्थिनी ७४.६७% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने तर खान समिउन्निसा अझीमुल हक ही विद्यार्थिनी ७४.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजमध्ये सायन्स शाखेचा निकाल पुन्हा १००% लागला. सायन्स शाखेत कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान अन्सारी उझमा अकिल या विद्यार्थिनीने ७५.५० % गुण मिळवून मिळवला. तसेच पटेल मोहम्मद अली असीम याने ७४.३३% गुण मिळवून सायन्स शाखेत कॉलेजमध्ये द्वितीय येण्याचा मान पटकावला तर हजवाने इकरा नदीम ही विद्यार्थिनी ७३.८३% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या घवघवीत यशाबद्दल पनवेल एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे तसेच दोन्ही कॉलेजचे प्राचार्य यांचे अभिनंदन केले आहे.





फोटो : याकुब बेग शाळा व पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल हुसैन काझी
Comments
Popular posts
पनवेल येथील पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटद्वारे गुडघ्याच्या १०० शस्त्रक्रिया...
Image
के.एल.ई कॉलेजमध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा...
Image
पनवेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मा.उपशहर प्रमुख यांच्यासह कार्यकर्त्यांचा रुग्णवाहिकेसह शिवसेनेत पक्ष प्रवेश ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न
Image
आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी काढला रूटमार्च..
Image
महादेव वाघमारे यांचे महानगरपालिकेच्या वादग्रस्त मालमत्ता करांच्या वसूली संदर्भातील उपोषण पाचव्या दिवशीही सुरु ; शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे संजोग वाघेरे-पाटील यांनी दिला पाठींबा...
Image