मच्छी विक्रेत्या महिलेची रोख रक्कम लंपास...
मच्छी विक्रेत्या महिलेची रोख रक्कम लंपास...


पनवेल दि २२ (संजय कदम) : पनवेल शहरातील उरण नाका येथे मच्छीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेची ६० हजार रुपये रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
            लीला भगत या शहरातील उरण नाका येथे मच्छी विक्री चा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे त्या आपल्या जागेवर व्यवसाय करत असताना त्यांच्या व्यवसायातुन जमा झालेली ६० हजार रुपयाची रोख रक्कम एका पिशवीत बाजूला ठेवली होती. मात्र अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून सदर [पिशवी लंपास केली. थोड्या वेळात पिशवी गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Comments
Popular posts
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image