बंद असलेला पेट्रोल पंप पुन्हा सुरू करण्याची शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची तहसीलदारांकडे मागणी....
ग्राहक कक्षाची तहसीलदारांकडे मागणी....

पनवेल / दि.१५ (संजय कदम) : पनवेल शहरातील शहीद भोसले पेट्रोल पंप गेले २ आठवडे बंद अवस्थेत असून हा पेट्रोल पंप त्वरीत सुरू करावा अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक सरंक्षण कक्षातर्फे पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
         पनवेल शहरातील तक्का गावाजवळील हायवे लगत असलेला शहीद भोसले पेट्रोल पंप गेले २ आठवडे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. तो पेट्रोल पंप त्वरीत सुरू करावा हि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ग्राहक सरंक्षण कक्षाची मागणी आहे. याबाबतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाखाली शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, कक्ष सहजिल्हा संघटक शशिकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पनवेल तालुक्याच्या वतिने पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांना देण्यात आले. 
यावेळी रायगड उपजिल्हा संघटक सुनित पाटील, पनवेल तालुका संघटक कुणाल कुरघोडे, रोहिंजन उपविभाग प्रमुख विलास पवार, खांदा काॅलनी शहर समन्वयक गणेश परब, मनिष मोरे, चेतन गिध, अक्षय तांबोळी व शिवसैनिक उपस्थित होते. तरी हा पेट्रोल पंप सुरू न झाल्यास ग्राहकांच्या मागणीनुसार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. 






फोटो : विजय तळेकर यांना निवेदन देताना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी
Comments