अतिवेगाने अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत १ ठार ३ जखमी...
देवदर्शनहून परतताना कुटुंबावर काळाचा घात; अतिवेगाने अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत १ ठार ३ जखमी...

पनवेल / दि.१५ (संजय कदम) : कोल्हापूर येथून देवदर्शन करून आपल्या घरी परतताना एका कुटुंबावर काळाने झडप घातली. आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास अतिवेगाने वाहन कंट्रोल न झाल्याने कारचालकाने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात वाहनाला डाव्या बाजूने जोरात धडक दिली. या अपघातात कारमध्ये असलेले एकाच कुटुंबातील एक जणाला आपले प्राण मुकावे लागते तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे. 
             भिवंडी, मानकोली येथे राहणारे साहू कुटुंबीय कोल्हापूर येथून देवदर्शन करून आपल्या किआ कारने (एमएच ०४ एलएच ९४७९) ने घरी पुन्हा परतत असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास खालापूर पोलीस ठाणे हद्दीत कारचालक अभिषेककुमार मुन्नीलाल साहू (वय 37) याला अतिवेगाने वाहन चालवत असताना कंट्रोल न झाल्याने त्याने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला डाव्या बाजूने जोरात  धडक दिली. या धडकेत कारमध्ये असलेले मुन्नीलाल साहू (वय 68) यांच्या डोक्याला गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला. तर कारचालक अभिषेक मुन्नीलाल साहू (वय.37) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याचप्रमाणे शांतीदेवी मुन्नीलाल साहू (वय 60 वर्षे) यांचे डावे पायाला फ्रॅक्चर होवून गंभीर जखमी झाले तसेच लक्ष्मीकुमारी अभिषेककुमार साहू (वय 33) यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. सुदैवाने या अपघातामध्ये कुमारी त्रिशा अभिषेक साहू (वय ५) व कुमार दर्शील अभिषेक साहू (वय १) या दोन चिमुकल्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखा पळस्पे मोबाईल पथक व आयआरबी पथक यांनी तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेने एमजीएम हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले.
फोटो : अपघातग्रस्त वाहन व जखमी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image