शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते नवीन शिवसेना शाखेचे उदघाटन....
नवीन शिवसेना शाखेचे उदघाटन....

पनवेल दि.०८ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील येथील देवद येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या नवीन शाखेचे उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच यावेळी स्थानिक शेकडो पुरूषांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
           
यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी येथील सर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच या शाखेच्या माध्यमातून येथील सामान्य जनतेचे प्रश्न सुटतील अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संदीप तांडेल, ज्ञानेश्र्वर बडे, महानगर समन्वयक दिपक घरत, विभाग प्रमुख जयंत पाखरे, विशाल भोईर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो : नवीन शाखेचे उदघाटन करताना शिरीष घरत
Comments