हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
पनवेल : -  रोटरी क्लबच्या सेवा विभागाच्या मुख्य अंगांपैकी  *Disese prevention & Treatment* हे एक महत्वाचे अंग आहे .त्याच्या अनुषंगाने  एक *"AED MACHINE"* वासुदेव बळवंत फडके  नाट्यगृहात दुसऱ्या मजल्यावर बसविण्यात आली असून ती आज पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आली. या मशीन च्या साहाय्याने एखादया व्यक्तीस अचानक हृदय विकाराचा झटका आल्यास तातडीचे उपचार देता येतात .

हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ पुणे - लक्ष्मी रोड , रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल , आणि रिव्हाईव हार्ट फाउंडेशन यांच्या साहाय्याने राबवित आहोत.
या *"AED MACHINE"* चे हस्तांतरण  हे  रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे सन्माननीय प्रांतपाल डॉ.अनिल परमार यांच्या हस्ते  माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात या आले.
 सदर प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सचिव अनिल ठकेकर, माजी अध्यक्ष संतोष घोडींदे, डॉ. आमोद दिवेकर, भगवान पाटील, खजिनदार मनोज आंग्रे,गजानन जोशी, दिपक गडगे, योगेंद्र कुरघोडे, रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलचे अध्यक्ष प्रदीप डावकर, माजी अध्यक्ष मनोहर कांडपीळे,पुढील अध्यक्ष गिरीश समुद्र, डॉ.कीर्ती समुद्र, साधना धारगळकर, विश्राम एकामबे, श्री. नवरे, व इतर रोटरी सदस्य तसेच ऍन्स पुष्पलता पाटील, गुणवंती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर मशीन चा योग्य वापर करण्याचे प्रशिक्षण नाट्यगृहातील  मार्गदर्शक राजेश पाटील यांना देण्यात आले जेणे करून ते अत्यावश्यक वेळी ते तातडीने वापर करू शकतील.
Comments