इकोग्लोब पॅकेजिंग मधील कामगारांना 8000 रू पगारवाढ कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थी...

कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी 

मध्यस्थी...




पनवेल / प्रतिनिधी : - 

कामगार हाच संघटनेचा आत्मा हे धेय्य ठेऊन कामगारांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटना हि एकमेव संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी १८ ते २० पगारवाढीचे करार केले जातात.

काही महिन्यांपूर्वीच कामगारांनी सभासदत्व स्विकारलेल्या पेण येथील इकोग्लोब पॅकेजिंग प्रा.लि. या कंपनीतील कामगारांसाठी ८००० रुपये पगारवाढीचा करार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. करारनाम्यानुसार कामगारांना महागाई भत्ताएक ग्रॉस सॅलरी बोनस व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य कराण्यात आले आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कीकंपनीच्या प्रगतीबरोबर कामगारांचीही आर्थिक परिस्थिती सुधारावयास हवी.तसेच कामगारांनी पण कंपनी आपली समजून प्रामाणिक पणे काम करावे व आपल्या मेहनतीचा मोबदला हक्काने घ्यावा.

या करारनाम्याप्रसंगी न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरतसरचिटणीस वैभव पाटीलउपाध्यक्ष किरीट पाटीलकंपनीचे डायरेक्टर सिद्धी अय्यरकाँग्रेस नेते मिलिंद पाडगांवकरमार्तंड नाखवासंघटक - लंकेश ठाकूरआदित्य घरतआनंद ठाकूरअंगद ठाकूरराजेश ठाकूरअजित ठाकूरयोगेश रसाळविवेक म्हात्रेराजेंद्र भगत तर कामगार प्रतिनिधी,रोहन अंबाडेजगदीश पाटीलसुनील दिघेराम ठोंबरा व युवराज पाटील आदी उपस्थित होते.

Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image