जागतिक पुस्तक दिन जेष्ठ नागरिक संघ पनवेल येथे उत्साहात साजरा....
जागतिक पुस्तक दिन जेष्ठ नागरिक संघ पनवेल येथे उत्साहात साजरा....

पनवेल / प्रतिनिधी : -  जागतिक पुस्तक दिनानिमित्त के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय पनवेल तसेच पनवेल मधील साहित्यिक यांनी स्व लिखित पुस्तके जेष्ठ नागरिक संघ पनवेल यांच्या श्रीमती सरलताई बापट या वाचनालयाला  भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सर्वप्रथम संस्थेचे कार्यवाह काशिनाथ जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेच्या अध्यक्षा ॲड. श्रीमती सुनिता जोशी यांनी पुस्तक दिनाचे महत्व विशद केले. तसेच पनवेल मधील साहित्यिकांनी स्व लिखित पुस्तके वाचनालयाला भेट दिल्यानंतर जेष्ठ नागरिक संघाचे सचिव सुनील खेडेकर यांनी पुस्तके दिल्याबद्दल आभार मानले. 
सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्याम वालावलकर, ॲड. सौ.माधुरी थळकर, रमेश चव्हाण, विनायक वत्सराज, ग्रंथपाल सौ. निकेता शिंदे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष  रोहिदास पोटे, नागनाथ डोलारे , सौ.अलका वैशंपायन, कु.श्रेया सहस्रबुद्धे, मोहन तळेकर, राजकुमार ताकमोगे व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत गुर्जर, कोषाध्यक्ष निला आपटे, नारायण देशपांडे, सूर्यकांत लांजेकर, प्रकाश माणिक, श्रीमती. वंदना दाते आदी उपस्थित होते. सहकार्यवाह जयश्री शेटे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments