क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट तर्फे सावित्रीबाई फुले चषक २०२३ महिलांसाठी क्रिकेट सामने..
सावित्रीबाई फुले चषक २०२३ महिलांसाठी क्रिकेट सामने...

पनवेल दि.१५ (वार्ताहर) : क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट पनवेल तर्फे एक दिवस जल्लोष असे औचित्य साधत २० एप्रिल रोजी कर्नाळा स्पोर्ट्स टर्फ ग्राउंड येथे महिलांसाठी सावित्रीबाई फुले चषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिला पोलीस -डॉक्टर -पत्रकार -वकील-शिक्षिका-नगरसेविका व अन्य क्षेत्रातील महिला यांच्यासाठी अंडर आर्म क्रिकेट सामने खेळवण्यात येणार आहेत. 
                याविषयी बोलताना प्रितम म्हात्रे यांनी सांगितले कि, हा स्तुत्य असा उपक्रम असून नेहमी रुपालीताई शिंदे महिलांच्या न्यायहक्कासाठी लढत असतात व सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील महिलांसाठी एक दिवस जल्लोष म्हणून एकदिवस स्वतः साठी बाजूला ठेवून स्वतः साठी जगण्याचा आनंद ह्या कार्यक्रमाच्या संकल्पनेतून मिळत आहे,फक्त पत्रकारिता न करता समाजाला देखील आपण काही देणे लागतो या हेतूने क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन व त्यांची पूर्ण टीम सामाजिक कार्ये करत आहेत व त्यांना माझे नेहमी सहकार्य राहील असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.
फोटो : प्रितम म्हात्रे
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image