देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायकाची प्रतिमा दिली भेट..
श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायकाची प्रतिमा दिली भेट

पनवेल / दि.१६(संजय कदम): देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह हे तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ या सोहळ्यासाठी खारघर येथे आज आले होते. या साठी हेलीकॉप्टरने खारघर येथे दाखल झाले. त्यावेळी हेलिपॅडवर  शिवसेना पनवेल महानगर प्रमुख तथा मा.नगरसेवक ऍडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना पनवेल मधील प्रसिद्ध श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायकाची प्रतिमा त्यांना भेट दिली आणि त्यांचे स्वागत केले. 
      
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, बेलापूरच्या मंदाताई मात्रे, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे तसेच इतर राजस्व अधिकारी उपस्थित होते.  दरम्यान, हेलिपॅड वर स्वागत करण्याची संधी दिल्याबद्दल प्रथमेश सोमण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.


फोटो: अमित शाह यांचे स्वागत करताना प्रथमेश सोमण
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image