दरोडा व जबरी चोरीचे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला मानपाडा पोलीसांनी अवघ्या २ तासात केली अटक...
मानपाडा पोलीसांनी २ तासात केली अटक...
पनवेल / दि.०५ (संजय कदम) : ओलाचालकाच्या कारला कट मारून त्याला शिवीगाळ करुन त्याच्या खिशातील पाकीट व कारमधील दोन मोबाईल फोन जबरीने काढून घेणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात अटक केली आहे. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात खुन, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
                     या प्रकरणातील फिर्यादी राजन पारस चौधरी (वय २२, रा.मुंबई) ह्यांच्या गाडीत नेवाळी येथून तिघे जण डोंबिवली येथे जाण्यासाठी बसले. डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे आले असता त्यांच्या कारला एका रिक्षाने कट मारून रिक्षा कारच्या पुढे उभी केली. रिक्षातुन दोन इसम खाली उतरुन ते फिर्यादी यांना शिवीगाळ करुन त्यांच्या खिशाची तपासणी करु लागले. त्यानंतर कारमध्ये बसलेले इतर तीन इसमांसह या पाचही आरोपींनी फिर्यादीला मारहाण करुन त्यांचे पॅन्टचे खिशातील पाकीट व कारमध्ये ठेवलेले त्यांचे दोन मोबाईल फोन जबरीने काढुन घेऊन रिक्षातुन पळुन गेले. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन  मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी. शेखर बागडे यांनी तात्काळ गुन्हे शाखेचे पोनिरी बाळासाहेब पवार, सपोनिरी सुरेश डाबरे, सपोनि अविनाश वनवे, सपोनि सुनिल तारमळे, सपोउपनि भानुदास काटकर, पोहेकॉ विकास माळी, पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ संजय मासाळ, पोहेकॉ गिरीश पाटील, पोकॉ अशोक आहेर, पोकों विजय आव्हाड यांचे वेगवेगळे टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले. सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी आरोपी चंद्रकांत उर्फ मोठा चट्या जमादार, शिवा तुसंबल, सत्यप्रकाश कनोजिया यांना अटक केली. यासोबत एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीचा शोध चालु आहे. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इतर गुन्हयात चोरलेले एकंदर ९ मोबाईल फोन, ०१ लॅपटॉप, रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकुण २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रांकांत जमादार हा तडीपार असून त्याच्यासह इतर आरोपींवर डोंबिवली, टिळकनगर, खडकपाडा, हिललाईन पोलीस ठाणेत खुन, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
फोटो : मुद्देमालासह मानपाडा पोलीस अधिकारी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image