वळवली-टेभोंडे गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित ; शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला हंडामोर्चाचा इशारा...
शिवसेनेने दिला हंडामोर्चाचा इशारा...

पनवेल / दि.२४ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील वळवली-टेभोंडे गाव गेल्या १५ दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण धरू नये म्हणून पालिकेने लवकरात लवकर पावले उचलावीत अन्यथा शिवसेनेच्या वतीने पालिकेवर हंडामोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी पनवेल महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता श्री. सावंत यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 
                या निवेदनात शिवसेना पनवेल तालुका प्रमुख विश्वास जगन्नाथ पेटकर यांनी म्हटले आहे कि, पनवेल तालुक्यातील वळवली-टेभोंडे गाव गेल्या १५ दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. पनवेल महानगरपालीकेकडून तुटपंजा पाणीपुरवठा होत असून पाण्याचा मुद्दा एरणीवर आला आहे. गावात पाण्याचा व्यवस्थितपणे नियोजन होत असताना अचानकपणे गेल्या १५ दिवसापासून गावात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहे. याप्रकरणी शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी वळवली-टेभोंडे गावाचा पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण धरू नये म्हणून लवकरात लवकर पाऊले उचलावीत यासाठी निवेदन दिले आहे. तसेच जर पाण्याचा प्रश्न सुटत नाही तर महाविकास आघाडीच्यावतीने पनवेल महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदार महापालिका असेल असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मा सरपंच दिलीप पाटील, महिला आघाडीच्या भारती पेटकर, धनश्री पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.







फोटो : महापालिकेला निवेदन देताना विश्वास पेटकर यांच्यासह इतर
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image