जागतिक यकृत दिनानिमित्त मोफत यकृत तपासणी उपक्रम मोहिमेचा शुभारंभ...
दहा हजार नागरीकांची यकृताची मोफत तपासणी करण्याचे मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे उद्दिष्ट....


नवी मुंबई - : जागतिक यकृत दिनानिमित्त १९ मे ते 3१ मे या कालावधीत मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांच्या पुढाकाराने  मोफत यकृत तपासणी तसेच त्यासंबंधीत पॅकेजेस उपलब्धकरुन दिली जाणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि संगमनेर येथील १०,००० हून अधिक लोकांची यकृत कार्य चाचणी, अल्ट्रासाऊंडद्वारे तपासणी तसेच रक्ततपासणी केली जाणार आहे. याठिकाणी आहारतज्ञ आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टरोलॅाजिस्ट तज्ज्ञांचा मोफत्त सल्ला घेण्याचा लाभ  याठिकाणी घेता येणार आहे. आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी डाँ.अमृतराज सी, डाँ.हीरक पहारी, डॉ.नवीन एनके, डाँ.विक्रम राऊत, श्री.जसनजीत व दुर्गाप्रसाद उपस्थित होते.

सध्या, यकृताचे आजार सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतात. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी), नॉन अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (एनएएसएच), एंड स्टेज क्रॉनिक लिव्हर डिसीज, सिरोसिस, लिव्हर फेल्युअर, तीव्र आणि क्रॉनिक हिपॅटायटीस, यकृत कॅन्सर, पित्त नलिकाचा कर्करोग अशा आजारांनी पिडीत व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज  ही आजकाल लोकांमध्ये दिसणारी एक सामान्य समस्या आहे. विविध तपासणी साधनांच्या सहाय्याने रुग्णांवर योग्य उपचार करणे ही एक काळाची गरज आहे. मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबईने यांच्या पुढाकाराने यकृत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जेणेकरुन लवकर निदान व उपचारास मदत होईल.

डॉ विक्रम राऊत, संचालक - यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया, मेडिकोव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई सांगतात की, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) हा मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या रुग्णांमध्ये वारंवार यकृताचा आजार होतो. अलीकडील अभ्यास दर्शविते की भारतातील 30% लोकसंख्या नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज मुळे ग्रस्त आहे. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजची गुंतागुंत म्हणजे फायब्रोसिस, सिऱ्होसिस आणि हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, एक्स्ट्राहेपॅटिक निओप्लाझिया आणि इतर अवयवांचे नुकसान देखील होते. एनएएफएलडीला मेटाबॉलिक सिंड्रोमचा एक घटक म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोध किंवा टाइप 2 मधुमेह मेलिटस (T2DM), उच्च रक्तदाब आणि डिस्लिपिडेमिया यांचा समावेश होतो. रोगाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या 

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असलेल्या रुग्णांना नॉन अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस (NASH) आणि सिऱ्होसिसचा त्रास होतो. भविष्यात फायब्रोसिस असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. प्रगत फायब्रोसिस असलेल्या रुग्णांना नॉन अल्कोहोलिक स्टेटहेपेटायटिस  रुग्णांची संख्या 2030 पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

डॉ विक्रम राऊत पुढे सांगतात की, लोकांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज  आणि यकृताच्या इतर समस्यांना सामोरे जाण्यास मदत करण्यासाठी, आम्ही मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे ज्यामध्ये लोकांवर उपचार निश्चित करण्यासाठी बारकाईने निरीक्षण केले जाणार आहे. स्टीटोसिसची उपस्थिती निश्चित करण्यासाठी आम्ही प्रारंभिक तपासणी म्हणून ॲबडोमिनल यू.एस. तसेच पुढील जोखीम निश्चित करण्यासाठी सीरम फायब्रोसिस सारख्या चाचण्या केल्या गेल्या. उच्च एचबीए, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि डिस्लिपिडेमिया असलेल्या मधुमेहींचीही या शिबिरात तपासणी केली जाणार आहे  कारण अशा लोकांना यकृताच्या समस्यांचा धोका अधिक असतो.
Comments