अनोळखी रिक्षा चालकाची प्रवाश्याला मारहाण..
अनोळखी रिक्षा चालकाची प्रवाश्याला मारहाण..


पनवेल दि.१२ (वार्ताहर): रिक्षा भाड्याचे देवाण घेवाणीवरून अनोळखी रिक्षा चालकाने शिवीगाळ करून प्रवाशाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून निघून गेल्याची घटना पनवेल जवळील उसर्ली खुर्द येथे घडली आहे.
शशिकांत शेळके (वय ५०) यांनी पनवेल स्टेशन येथून रिक्षा करून ती घेऊन उसर्ली खुर्द  येथे चालले असताना त्यांची रिक्षा चालकाबरोबर भाड्याच्या देवाण घेणावी वरून बोलाचाली झाली. यावेळी सदर रिक्षा चालकाने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून ज्याची किंमत जवळपास २२ हजार रुपये इतकी आहे ती घेऊन निघून गेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image