बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्यांवर खारघर पोलिसांची कारवाई....
बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्यांवर खारघर पोलिसांची कारवाई....


पनवेल दि.२५ (संजय कदम) : खारघर परिसरात बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करणाऱ्यांवर खारघर पोलिसांनी कारवाई करत १३६० रुपये किमतीचे २२ बाटल्या जप्त केले आहे. 
              खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्याअंतर्गत खारघर परिसर नो-लिकर झोन असतानाही अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या देशी विदेशी मद्यसाठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती त्यांना बातमीदाराद्वारे मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खारघर सेक्टर १९ मुर्बी गाव येथे एक इसम तसेच खारघर गाव सेक्टर १४ येथील दिव्यांग पान स्टॉलच्या बाजुला एक ज्येष्ठ महिला बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याने या दोन्ही ठिकाणी कारवाई करत १३६० रुपये किमतीचे देशी दारुचे २२ बाटल्या जप्त केल्या आहेत. आगामी काळात सुद्दा अश्या प्रकारच्या कारवाया खारघर परिसरात होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image