छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेतर्फे राबवण्यात आले विविध उपक्रम...
शिवसेनेतर्फे राबवण्यात आले विविध उपक्रम...

पनवेल वैभव /  दि. ११ (संजय कदम) : छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंती शिवसेना खान्दा कॉलनी विभागाच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरी करण्यात आली. या उपक्रमाला शिवसेना पनवेल विधानसभा जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.      
माजी नगरसेवक शिवाजीराव थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खान्दा कॉलनी विभागाच्या वतीने जेष्ठ नागरिक ओळखपत्र वाटप, झोपडपट्टीतील गरीब नागरिकांना धान्य वाटप, रेशनकार्ड वाटप, उत्पन्नाचे दाखले, विधवा महिलांच्या मुलांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय आरटीई मुलांच्या शिक्षणाचे फॉर्म भरून देण्यात आली. या सर्व उपक्रमात नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी महादेव मुळीक, शंकरराव मुळीक, जगन्नाथ शिंदे, नामदेव मुळीक, श्रीयुत काळे, सुरेश पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 
फोटो : रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत राबवण्यात आले उपक्रम
Comments
Popular posts
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image