बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी केली वचनपूर्ती ; सेफ्टी किट तसेच सरावासाठी लागणारे सेटअप दिले...
सेफ्टी किट,सरावासाठी लागणारे सेटअप दिले...

पनवेल दि.०८ (संजय कदम) : कबड्डी व मॅरॅथॉन मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंच्या सरावासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी मदतीचा हाथ पुढे करत त्यांना सरावासाठी मोफत सेफ्टी किट दिले तसेच सरावासाठी लागणारे सेटअप देण्याचे जाहीर केले. त्यानुसार त्यांनी दिलेला शब्द पाळून खेळाडूंना  सेफ्टी किट तसेच सरावासाठी लागणारे सेटअप तात्काळ दिले.
       कळंबोली मधील काही मुले बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्याकडे गेली होती व त्यांनी कबड्डी व मॅरेथॉनच्या प्रॅक्टिससाठी त्यांना लागणारे मटेरियल सेफ्टी किट याची त्यांनी मागणी केली होती.  त्यावेळी रामदास शेवाळे यांनी हे साहित्य देण्याचे जाहीर केले असून त्याप्रमाणे आज शिर्के गार्डन कळंबोली येथे सराव व व्यायाम साठी लागणारे साहित्याचे उद्घाटन करून समर्पित केले. तसेच खेळा सोबत शिक्षणावर देखील लक्ष द्या व राज्याचे देशाचे नाव उज्वल करा असे आवाहन त्यांनी केले व संगणकीय खेळा ऐवजी मैदानी खेळाचे महत्त्व पटवून दिले सर्व मुले पौगंडावस्थेतील असून कोणीही व्यसना चा आहारी जाऊ नका व कोणा दुसऱ्याला जाऊन देऊ नका असा सल्ला दिला रामदास शेवाळे यांनी दिला आहे
फोटो : साहित्य वाटप
Comments