दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व प्रशिक्षार्थी यांना आर्थिक सहाय्य...
दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व प्रशिक्षार्थी यांना आर्थिक सहाय्य...

 पनवेल / वर्ताहर - : 15 फेब्रुवारी रोजी तालुका मिशन वात्सल्य समिती पनवेल व प्रेरणा संस्था व युवा फाऊडेशन, मानदेशी फाऊडेशन या संयुक्त विदयमाने 10 व 12 वी उतीर्ण विदयार्थीना 2 हजार रुपये तसेच 10 वी 12 साठी प्रशिक्षार्थी रुपये 1 हजार आर्थिक सहाय्य तहसिलदार तथा मिशन वात्सल्य समिती अध्यक्ष विजय तळेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला  चेतन गायकवाड (बालविकास प्रकल्प अधिकारी), अल्लाउददीन शेख (ग्रामस्वराज्य चे अध्यक्ष), अॅड. शुभांगी  (CWC रायगड सदस्य), चेतन गायकवाड (शिक्षण विभाग), वैशाली वैदु (वि.अ.सा.एबाविसेयो विभाग) माधवी पवार (मानदेशी फाऊडेशन ऑफीसर), शैलेश (विधी प्राधिकरण)प्रेरणा संस्थेच्या प्रणाली कोडीसलेकर, माधुरी शिंदे, आसमा, युवा फाऊडेशन चे विक्की कागडा उपस्थित होते. मिशन वात्सल्य समिती अंतर्गत 116 विधवा महिलांना पिवळे शिधापत्रिकाचा लाभ देण्यात आला आहे. तसेच एल आयसी व इतर विमा पॅलिसी असे एकुण 20 महिलाना लाभ देण्यात आला. संजय गाधी निराधार योजनेचा 36 विधवा महिला लाभ दिला. अंत्योदय योजनेचा 21, बालनिधीचा 175, प्रधानमंत्री जीवन ज्योतीचा 6 असे लाभ आज पर्यत विधवा महिला मिळवून दिला आहे.
Comments