भानूबेन प्रवीण शहा विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न....
भानूबेन प्रवीण शहा विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न....
पनवेल / दि.१०(वार्ताहर): युसुफ महेरअली सेंटर संचलित भानुबेन प्रवीण शहा विद्यालय तारा येथे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. 

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रत्नाकर भोईर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या बक्षीस वितरण समारंभामध्ये सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून अव्वल आलेल्या कु.पायल रघुनाथ घरत, कु.पायल सुरेश कोळी, कु.जागृती चंद्रकांत घरत, कु.सौंदर्या विजेंद्र म्हात्रे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. सेंटरचे सह सचिव मधु मोहिते, तारा गावातील ज्येष्ठ नागरिक तथा सेवा निवृत्त शिक्षक पांडुरंग म्हात्रे गुरुजी, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष संतोष पाटील, सेंटरचे व्यवस्थापन समिती सदस्य अनिल हाईबर, माध्यमिक विद्यालय रावे च्या मुख्याध्यापिका एम.एस. तांडेल, दादा मिया दिवाण उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक किफायत अंतुले, दुष्मि ग्रामपंचायत सरपंच रश्मी भगत, उपसरपंच अरुणा घरत, माधुरी मोहिते, बाळकृष्ण सावंत यांच्यासह शालेय शिक्षण समितीचे सदस्य, पालक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाने करण्यात आली.






फोटो: वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image