महाशिवरात्री निमित्त केदार भगत मित्र परिवाराकडून खिचडी प्रसादाचे वाटप...
केदार भगत मित्र परिवाराकडून खिचडी प्रसादाचे वाटप...
पनवेल / वार्ताहर : - केदार भगत मित्र परिवाराकडून महाशिवरात्री निमित्त रामेश्वर देवस्थान येथे खिचडी प्रसादाचे  वाटप करण्यात आले. यावेळी २००० ते २५०० भाविकांनी प्रसादाचा  आस्वाद घेतला, याप्रसंगी भाविकांनी केदार भगत मित्र परिवाराचे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले.

यावेळी युवा नेते केदार भगत,  ट्रस्ट चे अध्यक्ष उमेश इनामदार तसेच सुमित दसवंते, नितेश भगत, शेषनाथ गायकर, भावेश शिंदे, रवी  परचे,  संतोष वर्तले, हर्षद गडगे, योगेश साळवी, संकेत दसवंते, ब्रिजेश बहिरा,उज्वल पाटील, प्रमोद भगत, जयेश भगत, निकिता पाटील, गीतांजली भगत, योगिता डांगरे, संगीता  पोतदार, ज्योती लांगी, अनिता मढवी आदी भक्तगण उपस्तिथ होते.
Comments