महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस ४८ तासाच्या आत गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने केली अटक..
गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने केली अटक ...
पनवेल /  दि.१५ (संजय कदम) : कोपरखैरणे येथील खाडीलगतच्या झाडाझुडपामध्ये सापडलेल्या अनोळखी महिलेची हत्येचा छडा लावण्यात गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला यश आले आहे. या हत्येतील आरोपीला ४८ तासाच्या आत गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने अटक  केली आहे.  
नवी मुंबई कोपरखैरणे येथील कांचनगंगा सोसायटीच्या विरुद्ध बाजूस असलेल्या नाल्यालगत खाडीकडे जाणान्या असंद रोडच्या डाव्याबाजुच्या झाडाझुडपामध्ये ३५ ते ४० वर्ष वयाच्या अनोळखी महिलेची अज्ञात व्यक्तीने तिचा गळा आवळून खुन केला तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह खाडीमध्ये टाकून दिला. या गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वनाथ कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक  प्रताप देसाई, पो. हवा आतिश कदम, पो. हवा. सतिश सरफरे, पो. हवा महेश पाटील, पी. हवा. अनिल यादव आदींच्या पथकाने करत असताना चौकशी दरम्यान त्यांना सदर महिला हि सफाई कामगार असून तिचे नाव सायरा बानु हासमी आहे व ती मानखुर्द येथे वास्तव्यास असल्याचे माहित पडले. तांत्रिक तपास व गुप्त माहितीदारामार्फत पोलिसांनी राजकुमार पाल (वय ४० वर्ष, धंदा वॉचमन) ह्याला शिताफिने ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने सायरा हिने लग्नाचा तगादा लावल्याने तिला कोपरखैरणे येथील कांचनगंगा सोसायटीच्या समोरील नाल्यालगत, खाडीकडे जाणा-या अरुंद रोडच्या डाव्या बाजूला, झाडाझुडपामध्ये बोलावून ठार मारल्याचे कबुल केले. कोणताही पुरावा नसताना गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने फक्त तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने फक्त ४८ तासात गुंता सोडवला आहे.  
फोटो : गुन्ह्यासंदर्भात माहिती देताना गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्ष
Comments
Popular posts
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त तिघांना मिळाले तात्काळ उपचार...
Image
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश...
Image
समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोमल मोहनिष भोईर यांना ''टॉप 30 इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड 2026'' प्रदान...
Image
पनवेलच्या सिद्धांत संजय कांबळे विद्यार्थ्याचे स्कॉटलंड सॉलिसिटर परीक्षेत घवघवीत यश...
Image
धरणे, नदीपात्रे आणि पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी लक्षात घेवून नागरिकांनी आवश्यक ती खरबदारी घ्यावी - वपोनि गजानन घाडगे..
Image