छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन...
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन... 

पनवेल दि १६, (वार्ताहर)  : महिला मंडळ आदर्श गाव शिवणसई- आंबे यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा व सत्यनारायणाची पूजा तसेच महिलांसाठी चला जिंकूया पैठणी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन १९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
                  
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवणसई-आंबे, श्रीराम मंदिर, राजीप शाळेच्या पटांगणात सकाळी ९ ते रात्री पर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
Comments