पनवेल शहरातील ६ दुकानांवर अँटी पायरसी प्रतिबंधक पथकाची कारवाई...
पनवेल शहरातील ६ दुकानांवर अँटी पायरसी प्रतिबंधक पथकाची कारवाई...


पनवेल / दि.१० (संजय कदम) : पनवेल शहरातील सहा मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानांवर अँटी पायरसी प्रतिबंधक पथकाने पनवेल शहर पोलिसांच्या साथीने कारवाई करून जवळपास ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे साहित्य हस्तगत केले आहे.

विवो मोबाईल इंडिया कंपनीच्या विविध साहित्याची हुबेहूब खरी खुरी नक्कल मारून सदर साहित्य दुकानात साठा करून त्याची सर्रास विक्री करत असल्याची माहिती कंपनीच्या अँटी पायरसी प्रतिबंधक पथकाला मिळताच सदर पथकाने पनवेल शहर पोलिसांच्या साथीने लाईन आळी व व्ही के हायस्कुल परिसरात असलेल्या शिवशक्ती कम्युनिकेशन, गोपाळ, नाथजी, रामदेव, साई आणि महादेव या दुकानांवर छापा टाकला असता त्यांच्याकडे सदर माल विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. कंपनीचे स्वामित्व हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्व कारवाई करीत जवळपास ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे व त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नकली मालाची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image