कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरे वाडीतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत ; पनवेलचे शिवसैनिक राहुल गोगटे यांचा पुढाकार...
२०० जीवनावश्यक वस्तूंचे कीट दुष्काळग्रस्तांना सुपूर्द..
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन केले होते.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पनवेल शिवसेनेचे उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांनी २०० जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले किट, ज्यामध्ये तांदूळ, साखर, तेल, मुगडाळ, चणाडाळ, साबण,चहा, वाटाणा डाळ, पीठ आदी वस्तूंचा समावेश असलेले किट आज दि.१ नोव्हेंबर रोजी मु.बहिरे वाडी, पो.वारणा नगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे शिवसैनिकांच्या उपस्थितीत रवाना केले.
राहुल गोगटे यांनी या आधीही पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, मराठवाड्यातील पूरग्रस्तांना ५१,००० हजारांचा चेक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे , शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या, छत्री चे वाटप, कोकणातील गणेश भक्तांसाठी मोफत बस व्यवस्था, तसेच शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना बिलातून सूट मिळवून देणे आदी समाजोपयोगी मदत शिवसेनेच्या माध्यमातून गोगटे करत असतात.
या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिवसेना जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर व नगरसेवक तथा महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी गोगटे यांच्या उपक्रमाचे कौतुक करून आमच्याकडून देखील नेहमी सहकार्य मिळत राहण्याचे सूतोवाच केले.
यावेळी शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनवणे, शहर संघटक अभिजित साखरे, उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, सुजन मुसलोंडकर, सुनिल खळदे,आदी उपस्थित होते.