के.गो.लिमये वाचनालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ साजरा...
के.गो.लिमये वाचनालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ साजरा... 

पनवेल वैभव / प्रतिनिधी  : - शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” कार्यक्रमअंतर्गत के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या  संयुक्त विद्यमाने संस्थेने १५ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिनांक १४/१ /२०२३ रोजी भगिनी समाज यांचा शुद्धलेखन स्पर्धा  व बक्षीस  वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. दिनांक १५/१/२०२३ रोजी गंधार बालनाट्य कार्यशाळेतील मुलांनी ‘भ-भ-भुताचा’ या नाटकाचा प्रयोग अतिशय सुंदर रितीने सादर केला. संस्थेतर्फे मुलांना प्रमाणपत्र व खाऊचे वाटप करण्यात आले.
       त्याचप्रमाणे दिनांक १६/१/२०२३रोजी ‘वाचकांशी हितगुज’ या कार्यक्रमाचे अंतर्गत  मा.श्री.अरुण भिसे साहेब (कफ संस्था) पनवेल यांनी वाचकांशी संवाद साधला.या कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक १७/१/२०२३ रोजी कु. श्रेया सहस्रबुद्धे यांच्या ‘द अनएक्सपेक्टेड’ पुस्तकाला तसेच श्री.नागनाथ डोलारे यांच्या ‘आदर्श राज्य’ या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्याचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. संदीप बोडके यांना दर्पण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. दिनांक १८/१/२०२३ रोजी अड.श्रीमती सुनिता जोशी यांच्या  ’बंदिशाळा’ या कादंबरीचे  प्रकाशन को.मा.प.स चे अध्यक्ष श्री रोहिदास पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वैखरी बुक सेल न्यू पनवेल यांचे पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले.
दिनांक १९/१/२०२३ रोजी आगरी कवी संमेलनचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला मा.श्री.एल .बी पाटील, श्री. गणेश म्हात्रे श्री. गणेश कोळी ,सौ रजनी केणी यांनी आगरी भाषेतील कविता सादर केल्या. दिनांक २०/१/२०२३ रोजी ‘मराठी भाषेचे भवितव्य’ या परिसंवादात श्रीमती.सुलभा निंबाळकर  श्री. सुभाष कुडके  श्री. डॉ अविनाश पाटील  श्री.कुणाल लोंढे (पत्रकार) यांनी सहभाग घेतला होता. दिनांक २१/१/२०२३ रोजी  ‘अभिवाचन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये सौ.शलका गद्रे, सौ.सुप्रिया कुलकर्णी, सौ.वैशाली भावे, सौ.दिपा  पाटणकर, सौ. गौरी अत्रे यांनी सहभाग घेतला.
                     दिनांक २२/१/२०२३ ‘कवितांची अंताक्षरी’ हा  कार्यक्रम आयोजित केला होते. कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला. २३/१/२०२३ रोजी  ‘अनुभवकथन’, आठवणी त्या काळातील प्रमुख पाहुणे श्री दत्तात्रेय त्रिंबक जाधव यांनी सादर  केले. दिनांक २४/१/२०२३ ‘मराठी गजल मुशायरा’  मा.श्री. अ.के.शेख  (जेष्ठ गजलकार) यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. २५/१/२०२३ रोजी अमराठी भाषिक मुलांसाठी ‘वक्तृत्व स्पर्धेचे‘ आयोजन केले होते. यामध्ये हुतात्मा हिरवे गुरुजी शाळा व दि.बा.पाटील शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता.यामध्ये मुलांना प्रमाणपत्र व खाऊचे वाटप करण्यात आले. दिनांक २७/१/२०२३  एन. एन. पालीवाला   (बाठिया हायस्कूल) न्यू पनवेल येथे ‘प्रश्नमंजूषा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. मुलांना संस्थेतर्फे पुस्तक,प्रमाणपत्र भेट देण्यात आले. दिनांक.२८/१/२०२३ रोजी  शेवटचे पुष्प  ‘कथाकथन’ या कार्याक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला श्रीमती. रजनी भानु यांनी  कथेचे उत्कृष्ट  सादरीकरण केले.
                        
 सर्व कार्यक्रमांना संस्थेचे कार्यवाहक श्री काशिनाथ  जाधव को.म.सा.प अध्यक्ष  रोहिदास पोटे, सहकार्यवाह  सौ.जयश्री  शेटे, उपाध्यक्ष श्री.श्याम  वालावलकर , सौ. अड थळकर ,कार्यकारी सदस्य श्री. चव्हाण  श्री. खेडेकर, श्री. वत्सराज, श्री .राजे, सौ.हिमालिनी  कुलकर्णी, श्रीमती.हेमा गद्रे , कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने वाचक वर्ग उपस्थित होता.
Comments