रेल्वे प्रवासात दोघांचे मोबाइल चोरीला ....
रेल्वे प्रवासात दोघांचे मोबाइल चोरीला ...

पनवेल / दि.११ ( वार्ताहर ) : रेल्वे प्रवास दरम्यान दोघा प्रवासाचे मोबाईल चोरीस गेल्याच्या घटना घडली आहे . 
                      पनवेल मधील रहिवासी प्रमोद बनकर हुबळीमधून मुंबईला येत असताना ट्रेनमधून त्यांचा २६ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीला गेला आहे. तर दुसऱ्या घटनेत पणव मेंदिरत्ता या विद्यार्थ्याचा मोबाइलही पनवेल सीएसटी लोकलमध्ये चोरीला गेला आहे. दोन्ही घटनांविषयी पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments