वाहन चालकांना तिळगुळ वाटप...

वाहन चालकांना तिळगुळ वाटप...


पनवेल / वर्ताहर - : वाहतूक सुरक्षा सप्ताहच्या अनुषंगाने पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दीत विद्यार्थी वाहक संस्थेच्या सहकार्याने वाहतूक नियम पाळण्याबाबत वाहन चालकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी रॅलीचे आयोजन करून संपूर्ण शहरात रॅली काढण्यात आली. तसेच संक्रांतीच्या निमित्ताने वाहतूकीचे नियम  पाळण्याबाबत चालकांना तिळगुळ वाटप करण्यात आले.

         वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी वाहतूक सुरक्षा सप्ताह राबवण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम सर्वांनी समजून घेतले पाहिजेआपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण स्वत:पासून घ्यायला पाहिजेवाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे मोठय़ा प्रमाणात अपघात होण्याचे प्रमाण आहे.  वाहतुकीचे नियम दंड आकारण्यासाठी नव्हेतर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आहेत. याची जाणीव नागरिकांना व्हावीम्हणून वाहतूक सुरक्षा सप्ताह प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात पाळला जातो. या दरम्यान वाहतुकीचे नियमत्यांचे महत्त्वसदर नियमांचे उल्लंघन केल्यानंतर होणारी दंडात्मक कारवाई सर्वांना माहीत व्हावी म्हणून प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Comments