पनवेल रेल्वे पोलिसांनी दोन प्रवाश्यांचे चोरलेले मोबाईल केले परत...
पनवेल रेल्वे पोलिसांनी दोन प्रवाश्यांचे चोरलेले मोबाईल केले परत...


पनवेल दि.०५(वार्ताहर):  पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात चोरीस गेलेले दोन मोबाईल फोन पुन्हा प्रवाश्यांना पनवेल रेल्वे पोलिसांनी परत केले आहेत.
       पनवेलमधील रेल्वे पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात प्रवासी अंकुश चक्रनारायण यांचा ४५ हजार रुपये किमतीचा आणि संतोष कुंभार यांचा २२ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीला गेला होता. या घटने बाबत त्यांनी रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दोन्ही प्रवाशांचे मोबाइल शोधून त्यांना परत केले आहेत. याबद्दल प्रवाशांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
Comments