लग्नाचे अमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार...
लग्नाचे अमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार...

पनवेल / दि.३१ (वार्ताहर) : अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुली बरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.  
तळोजा गावातील आदिक मन्सूर पटेल (वय 24) याने लग्नाचे आमिष दाखवून पिडीत मुली बरोबर वारंवार ईच्छेविरूध्द शारीरिक संबंध केले त्यामुळे पिडीत मुलगी हि गरोदर राहिली. त्यानंतर सदर पीडित मुलीला बाळ झाले व जन्मानंतर ते मयत झाले. याप्रकरणी एनआरआय पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य  ओळखुन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांनी आरोपीस तात्काळ अटक करणेबाबत सुचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोहवा जोशी, पोना राजेश मोरे, सुधीर पाटील आदींचे पथक आरोपीचा शोध घेत असतांना तो रात्री आस्का मजिद जवळ तळोजा गावात येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त झाली. त्यास तात्काळ ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास कामी आरोपीस खारघर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दाभाडे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
Comments