दिशा महिला मंच आयोजित हळदी-कुंकूचा थाट खास 'ती' च्या साठी उपक्रम उत्साहात संपन्न...
दिशा महिला मंच आयोजित हळदी-कुंकूचा थाट खास 'ती' च्या साठी उपक्रम उत्साहात संपन्न...

पनवेल / प्रतिनिधी : -     दिशा महिला मंच आयोजित हळदी-कुंकूचा थाट खास 'ती' च्या साठी या उपक्रमाचे आयोजन शनिवार 21 जानेवारी 2023 रोजी कामोठे येथील आगरी हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणेच हळदी कुंकू ची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन करण्यात आली .पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला बाजूला सारून सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच मानसन्मान मिळावा हीच भावना ठेऊन हळदी- कुंकू चे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी कामोठे आरोग्य विभागातील मेडिकल स्टाफ व आशा सेविका व सफाई कर्मचारी यांचाही या समारंभात सहभाग होता. 

आरोग्यकेंद्रात महिलांसाठी असणाऱ्या सुविधांची  माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली Meena Elements Ltd चे मा श्री प्रदीप माडे सरांनी सौदर्य प्रसादने व त्याबाबत माहिती व व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन केले हर्ब अँड ग्लोब चे संस्थापक कल्पेश सोमैया व मनिषा सोनवणे मॅडम यांनी केसांची काळजी कशी घ्यावी त्यावरील उपाय सांगितले, कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे कौतुक करत त्यांनी व्यासपीठाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.                        

पूर्वापार चालत आलेल्या त्या रूढीला परंपरेला कुठेतरी आळा बसावा म्हणून गेली चार वर्ष अशा महिलांना पहिला मान दिला जातो व त्यानंतर हळदी कुंकूला सुरुवात केली जाते, यावेळी 30 वैध्यत्व प्राप्त झालेल्या महिलांची ओटी भरून सन्मानित करण्यात आले आपला जीवनपट सांगताना त्या गहिवरुन गेल्या समाजात कणखरपणे उभं राहणं किती गरजेचे आहे हें सांगताना असावांचा बांधही फुटला होता अशा महिलांसाठी वेळोवेळी गरज असेल तेथे दिशा व्यासपीठ नेहमी त्यांच्याबरोबर असेल असे आश्वासन यावेळी व्यासपीठाच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी दिले.

व्यासपीठाच्या उपाध्यक्ष सौ विद्या मोहिते यांनी हसत खेळत वातावरणात कार्यक्रमाच्या सूत्रसंचालणाची धुरा सांभाळली तसेच महिलांनच्या व्यवसायाबद्दल माहिती सांगून त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहू असेही यावेळी त्या म्हणाल्या. सचिव ख़ुशी सावर्डेकर यांनी मनोरंजनात्मक खेळ घेऊन बक्षीसांचीही लायलूट यावेळी करण्यात आली. मीना खाकी चे प्रॉडक्ट महिलांना वाण देण्यात आले तसेच हर्ब अँड ग्लोब चे पाच लकी ड्रॉ ही महिलांसाठी ठेवण्यात आले होते. अशा या अगळ्या वेगळ्या समारंभात विचारांच्या देवाण घेवाणी बरोबर सर्व स्त्री समानता व ती ला जपण्याच कार्य हळदी कुंकू निमित्ताने झाले. व्यासपीठातील सख्यांच्या उत्तम सहकार्याने व जबाबदारीने हळदी कुंकवाचा हा समारंभ यशस्वीरित्या पार पडला. 

दिशा व्यासपीठाचा हा वेल गगनाच्या दिशेन जात आहे या व्यासपीठाला सहकार्य व सहभागी होणाऱ्या सर्वांचेच नेहमी ऋणी राहू असेही यावेळी निलम आंधळे  म्हणाल्या.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image