बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप यशस्वी...
बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप यशस्वी...

पनवेल / दि.१७(वार्ताहर): बँक ऑफ महाराष्ट्र मधील बहुसंख्य असलेल्या ए.आय.बी.ई.ए. संघटना ही मान्यता प्राप्त म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून बँकेच्या इमारतीत असलेले संघटना कार्यालय बँकेने जबरदस्तीने हिसकावून घेतले त्याच्या निषेधार्थ एकदिवसाचा लाक्षणिक संप केला गेला. या संपामुळे बँकेचे नित्याचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. 
              संपकरी कर्मचाऱ्यांनी झोनल ऑफिससमोर तीव्र निदर्शने केली ज्यात शहरातील बहूसंख्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी संघटनेचे संघटन सचिव अरविंद मोरे यांनी सांगितले की, व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवला की तो बंद करण्यासाठी व्यवस्थापन संघटनेविरुद्ध एका नंतर एक हल्ले करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून मान्यता प्राप्त संघटना म्हणून असलेल्या सवलती काढून घेतल्या जात आहेत. एकीकडे सरकारने गेल्या सहावर्षांपासून संचालक मंडळावरील कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी गेल्या सहा वर्षां पासून नेमला नाही तर दुसरीकडे संघटनेतर्फे करण्यात येत असलेली रचनात्मक टीका देखील व्यवस्थापन स्वीकारायला तयार नाही. सरकारने गेल्या सहा वर्षांपासून ठेवीदार, शेती यांच्या संचालक मंडळा वरील जागा भरलेल्या नाहीत. या मुळे बँकव्यवस्थापन अनिर्बंध सत्ता आपल्या हातात घेणून मनमानी निर्णय घेऊ पाहत आहेत. व्यवस्थापनाच्या या हुकूमशाही प्रवृत्तीच्याविरोधात करण्यात आलेल्या यशश्वी संपानंतर संघटना येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र करेल असा संघटने तर्फे इशारा देण्यात आला. 
यावेळी कामगार एकता कमिटीचे पदाधिकारी गिरीश भावे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा संपाला जाहीर पाठिंबा देत सांगितले की,  कामगार हे देशाचे शिल्पकार आहेत. कामगारांना त्यांचा त्यांना हक्क देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कामगार हे त्यांच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढत असतात. कामगारांचे देश जडणघडणामध्ये मोठे कार्य आहे. त्याचा सरकारने सन्मान करणे गरजेचे आहे असे म्हणाले. 
याप्रसंगी सदानंद पेंडेकर, बाबू जाधव, अभिषेक परब, अमोल पवार, जगदीप वाघचवरे, गोपीचंद पाटेकर, केदार म्हात्रे, साजन बेकरे, ओंकार देशपांडे, गणेश जोशी, मीनल प्रभू, दत्ता अलगवाले, सिद्धार्थ तायडे, योगेश चौधरी, सुनील बोरुडे, मनीष सरवदे, रमेश डोळस, रिया सावंत, दास, राजेश धारवे, प्रवीण जाधव, प्रभाकर अहिरे, अभय अडागळे, सोळंकी, दिलीप बोरसे आदी कर्मचारी उपस्थित होते.




फोटो : संप
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image