तळोजा पोलिसांनी केला दोन ठिकाणावरून देशी दारूचा साठा हस्तगत ...
 देशी दारूचा साठा हस्तगत .....
  

पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील धानसर येथील एका ढाब्यावर तसेच किरवली गाव येथील एका किराणा दुकानात तळोजा पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा हस्तगत केला आहे . 
                       धानसर येथील एका ढाब्यावर तळोजा पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणावरून जवळपास १७५०/- रुपये किमतीच्या देशी दारूच्या ५० बाटल्या हस्तगत केल्या आहेत . तर दुसऱ्या गटनेते किरवली गाव येथील एका किराणा दुकानात छापा टाकून तेथून १३०० /- रुपये किमतीच्या देशी दारूच्या २० बाटल्या हस्तगत केल्या आहेत . व त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे
Comments