रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी निलेश पोटे यांचा रोमहर्षक विजय..
 निलेश पोटे यांचा रोमहर्षक विजय

पनवेल दि. १७ (वार्ताहर) : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणान्या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या सन २०२५-२६ या रोटरी वर्षासाठी पनवेलमधील कुशल उद्योजक तथा पोटे मसाले कंपनीचे संचालक निलेश काशिनाथ पोटे यांची निवड झाली. त्यांनी माधुरी श्रीनिवास कोडूरु यांचा प्रचंड बहुमतांनी पराभव करुन रोमहर्षक विजय संपादन केला.
माजी अध्यक्ष गुरुदेवसिंग कोहली यांच्या नेतृत्वाखाली सागर हॉटेल, पनवेल येथे झालेल्या निवडणूक प्रक्रियेत उद्योजक निलेश पोटे यांनी हे उज्वल यश संपादन केले. अध्यक्षपदी निलेश पोटे यांची निवड जाहीर होताच उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


फोटो : निलेश पोटे
Comments