खारघर मध्ये 'विदर्भ युवक सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ' ची स्थापना...
खारघर मध्ये 'विदर्भ युवक सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ' ची स्थापना...

पनवेल, दि.2८ ( वार्ताहर ) : पनवेल महापालिका हद्दीत आणि नवी मुंबई वास्तव्य करणाऱ्या विदर्भातील सामाजिक कार्यकर्त्यांनी खारघर मध्ये बैठक घेवून विदर्भातील रुढी, परंपरा आणि सण उत्सवाची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी 'विदर्भ युवक सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ' ची स्थापना केल्याने विदर्भ मधील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
                      विदर्भातील अनेक जण पनवेल आणि नवी मुंबई परिसरात वास्तव्य करुन नोकरी, उद्योग, व्यवसाय करीत आहेत. विदर्भ मधील नागरिकांमध्ये एकजूट निर्माण व्हावी तसेच विदर्भातील रुढी, परंपरा आणि सण, उत्सवाची परंपरा टिकून राहावी, यासाठी 'विदर्भ युवक सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ'ची स्थापना करण्यात आली असून, या मंडळाचे कामकाज पाहण्यासाठी विजयकुमार कोहाड, कृष्णा खडगी,जनार्दन धुते, गणेश चुणचुणवार, अश्विनी हडपे, अनुराधा रंगारी, वैशाली चुणचुणवार, आशिष रंगारी, अनिल नहाते, अनिल मोटघरे, दिलीप नंदनवार, विरेंद्र किंगारे, सुधाकर सोरटे, कुंडलिक पौनीकर आदी पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. 'विदर्भ युवक सामाजिक-सांस्कृतिक विकास कामे केली जाणार आहेत.मंडळ'च्या अधिपत्याखाली विदर्भातील खाद्य संस्कृती आणि सामाजिक संस्कृतीचा प्रसार, प्रचार करणे, विदर्भातील थोर संत महापुरुषांच्या जयंती साजरी करुन व्याख्यानमाला आयोजित करणे, युवक-युवतींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, व्यवसाय वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणे, प्रतिष्ठित व्यावसायिक, डॉक्टर, कलाकार, खेळाडू, उच्चविद्या भूषित विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्यांना सन्मानित करणे, गोर-गरीब तसेच गरजू आणि होतकरुंना आर्थिक मदत करणे आदी कामे केली जाणार आहेत. 
फोटो -  विदर्भ युवक सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ' ची स्थापना
Comments