महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघेजण पसार ....
महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघेजण पसार  ....


पनवेल / दि. २९ ( वार्ताहर  ) :  रिक्षात बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघेजण मोटारसायकलवरून पसार झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे .                      
वासंती विजय कदम ( वय ५८ ) रा. करंजाडे या त्यांचे पती व सुने सोबत औषधे घेण्यासाठी रिक्षातून शहरातील वेलनेस मेडिकल येथे थांबल्या होत्या या वेळी  दोन इसम मोटारसायकलीवरून तेथे आले व रिक्षा चालकास पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तेथे थांबून त्यापैकी मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ज्याची किंमत जवळपास ५५.००० /-  रुपये इतकी आहे ते खेचून मोटारसायकलवरून पसार  झाले आहेत . याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments