पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ, बालक व महिला अत्याचार कायदे संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...
पनवेल वैभव / दि.२२(संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आज सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ, बालक व महिला अत्याचार कायदे संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनी नितीन ठाकरे, सपोनि प्रवीण फडतरे यांनी आज पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील मायनॉरिटी उर्दू व इंग्लिश स्कुल, पनवेल या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, महिला व बालक लैंगिक अत्याचार संबंधित कायदे, अति मोबाईल वापराचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मायनॉरिटी उर्दू व इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व 100 ते 125 विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो: पोलीस मार्गदर्शन