पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा निलेश सोनावणे यांची पुर्ननिवड...
पाचव्यांदा निलेश सोनावणे यांची पुर्ननिवड...
पनवेल/प्रतिनिधी
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पनवेल शासकीय विश्रामगृहात नुकतीच पार पडली. यावेळी 2023 ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी सर्वानुमते निलेश सोनावणे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी संजय कदम, सचिव पदी संतोष सुतार, सहसचिवपदी अनिल कुरघोडे, उपाध्यक्षपदी आनंद पवार व रवींद्र गायकवाड तर खजिनदारपदी हरेश साठे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. तर सल्लागारपदाची जबाबदारी सुनिल पोतदार व दिपक महाडिक  यांच्यावर सोपविण्यात आली. निलेश सोनावणे यांची अध्यक्षपदी पुर्ननिवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 
यावेळी निलेश सोनावणे यांनी पुन्हा एकदा आपल्यावर विश्‍वास दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व नवीन वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येतील तसेच लवकरच पुढील वर्षांच्या कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यात येईल असे सांगितले.
यावेळी संतोष भगत, अनिल भोळे, भरतकुमार कांबळे, गणपत वारगडा आदी सदस्य उपस्थित होते.
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image