आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर - जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे आरोग्य सेवेचा उपक्रम...
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे आरोग्य सेवेचा उपक्रम..

पनवेल वैभव / प्रतिनिधी -  : कोकण शिक्षक मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देवी अंबा माता मंदिर से.१३, खांदा कॉलनी येथे  जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने आणि सुश्रुषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
         या शिबिरात ब्लड प्रेशर, टेम्परेचर , ई.सी.जी.,ऑक्सिजन लेवल, एस पी ओ-२ , सी.बी.सी / क्रियाटीन इत्यादीचे मोफत तपासणी करण्यात आली. आवश्यक वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने माफक दरात हार्ट सोनोग्राफी, कार्डिओग्राफिक यांचेही तपासणी करण्यात आली. तसेच पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठी ऍन्जोग्राफी शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत करण्याचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पनवेलचे आदर्श मा.नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी स्वतः उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांसोबत स्वतःही आपली आरोग्य तपासणी करून घेतली. जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरीत्या राबवण्यात आले. फोटो : आरोग्य शिबीर
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image