तळोजा वसाहतीत सिडकोकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात...
तळोजा वसाहतीत सिडकोकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात...

पनवेल दि. १७ (वार्ताहर) : तळोजा वसाहतीत 'सिडको' कडून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तळोजा वसाहत महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यामुळे 'सिडको'कडून हे अखेरचे काम असून यापुढे रस्त्याचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे. दरम्यान, रस्त्याच्या कामातून सिडको अधिकाऱ्यांची सुटका होणार आल्यामुळे अधिकारी-कर्मचारी समाधान व्यक्त करीत आहे.
तळोजा वसाहत मधील रस्त्याची धूळधाण झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत. तळोजा वसाहत मधील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने बंद पडत असून रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे अन्यथा तळोजा वसाहतीत धावणारी एनएमएमटीच्या बसेस बंद करावे लागेल, असे पत्र नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या आडगांव आगार व्यवस्थापकाकडून पनवेल महापालिकेला देण्यात आले होते. तळोजा मधील सामाजिक तसेच राजकीय व्यक्तींनी देखील सिडकोकडे पत्र व्यवहार करून येथील रस्त्याची अवस्था वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर दहा महिन्यापूर्वी सिडकोकडून तळोजा फेज-१ मधील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १२ कोटी तर फेज-२ मधील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १६ कोटी असे जवळपास २८ कोटी रुपये खर्च करून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला एप्रिल महिण्यात मंजुरी देवून एजन्सीची नेमणूक देखील केली होती. सदर एजन्सीकडून मे अखेरीस काही सेक्टर कामाला देखील सुरुवात झाली होती मात्र पावसाळ्यात खड्डे पडल्यास सिडकोकडून निकृष्ट दर्जाचे कामे करण्यात आली असा ठपका ठेवण्यात येईल. याकारणाने पावसाळा समाप्त होताच रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून सदरचे काम हे सिडकोतर्फे अखेरचे काम असून यानंतर ते महापालिकेचे स्वाधीन केले जाणार आहे.
Comments