पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक ;अध्यक्षपदासाठी ऍड.मनोज भुजबळ तिसऱ्यांदा रिंगणात..
ऍड.मनोज भुजबळ तिसऱ्यांदा रिंगणात..

पनवेल वैभव / दि.१५ (संजय कदम) : पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होत असून यामध्ये असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. मनोज भुजबळ पुन्हा अध्यक्षपदासाठी रिंगणात उभे असल्याने हि निवडणूक चुरशीची होणार आहे. 
ऍड. मनोज भुजबळ यांच्या पॅनेलने या निवडणुकीत ११ उमेदवार उभे केले असून यापैकी ऍड.सुशांत घरत हे बिनविरोध निवडून आले आहे. मनोज भुजबळ यांनी प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. तसेच पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत सचिव पदासाठी ऍड. प्रल्हाद खोपकर हे चौथ्यांदा उभे राहिले आहेत तर उपाध्यक्षपदासाठी ऍड. संदीप जगे, सहसचिव पदासाठी ऍड. सिमा भोईर, खजिनदार पदासाठी ऍड. धनराज तोकडे, ऑडिटर पदासाठी ऍड. विशाल डोंगरे तर सदस्य पदासाठी ऍड. प्रगती माळी, दीपाली बोहरा, अमित पाटील. भूषण म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 

यासाठी येत्या बुधवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ दरम्यान नवीन कोर्ट इमारत येथे मतदान होणार आहे. यावेळी मनोज भुजबळ यांनी सांगितले कि, आम्ही निवडून आल्यास वकिल वर्गाच्या न्यायालयीन कामाकाजाच्या व इतर समस्या तातडीने सोडवणार असून नवोदित वकिलांकरीता शैक्षणिक व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणार आहोत. त्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा आम्हाला निवडून द्यावे असे आवाहन मनोज भुजबळ यांनी केले.फोटो : पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणी निवडणूकीत ऍड मनोज भुजबळ यांच्या पॅनेलची आघाडी
Comments