खड्डयातील पाण्यात बुडून दोन वर्षीय मुलीचा मृत्यू ...
खड्डयातील पाण्यात बुडून दोन वर्षीय मुलीचा मृत्यू ..

पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) :-  इमारतीच्या बांधकाम ठिकाणी असलेल्या पाणी भरलेल्या पाच -सहा फूट खोल खड्यात पडून दोन वर्षीय मुलगी बुडाल्याने त्यात तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे . 
                पुष्पक नगर ,करंजाडे येथे मोल मजुरी करण्याऱ्या कुटुंबियांसोबत कु. रिया राजकुमार मुर्मू ( वय २ ) ही राहत होती . ती आपल्या भावा सोबत त्या ठिकाणी खेळत असताना नकळतपणे लिफ्टच्या खड्ड्यावर लावलेल्या लाकडी फळ्या व फ़्लायवूड यांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेमधून पाणी भरलेल्या पाच -सहा फूट खोल खड्यात पडून ती बुडाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला आहे . या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments