विस्टा प्रोसेस फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने डॉ प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयास ३ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द ...
३ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द ...

पनवेल दि.०५ ( संजय कदम) : तळोजा औद्योगिक वसाहती मध्ये असलेल्या विस्टा प्रोसेस फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने आज पनवेल शहरातील रा. स्व. संघ जनकल्याण समिती डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयास डायलेसिस रुग्णांना मदत म्हणून रु.३,००००० चा धनादेश कंपनीचे एम.डी. भुपेंदर सिंग यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
    यावेळी कंपनीचे एम डी भूपेंद्र सिंग यांनी दिलेला धनादेश रुग्णालयाचे कार्यवाह राजीव समेळ व मुख्य संचालक व्यवस्थापक सुनील लघाटे व रुग्णालय जनसंपर्क अधिकारी प्रसन्न खेडकर यांनी स्वीकारला. यासाठी कंपनीचे सल्लागार चंद्रशेखर सोमण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी झालेल्या चर्चेत एम डी भूपेंद्र सिंग यांनी रुग्णालय करत असलेल्या कामाचे कैतुक केले. चार वर्षांपूर्वी त्यांनी डायलेसिस साठी लागणारा आर ओ प्लांन्ट बसवून दिला होता. डायलेसिसचे प्रमाण खूप वाढत आहे. गरीब रुग्णांना हा खर्च करणे न परवडणारा आहे. पटवर्धन रुग्णालयात दानशूर व्यक्तीच्या मदतीने केवळ ५०० रुपयात डायलिसिस केले जाते. हा दर अजून कमी करण्याचा रुग्णालयाचा विचार आहे  यासाठी मी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून विदेशातून काही मदत करता येईल का या साठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कंपनी व रुग्णालय या मधिल दुवा म्हणून कंपनीचे सल्लागारचंद्रशेखर सोमण यांचे रुग्णालय व्यवस्थापन समिती कडून विशेष आभार मानण्यात आले.
फोटो : विस्टा प्रोसेस फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने ३ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image