कळंबोली स्टील मार्केट मधील असुविधे विरोधात बाळासाहेबांची शिवसेनेचे एक दिवसीय लाक्षणिक बंद आंदोलन..
 एक दिवसीय लाक्षणिक बंद आंदोलन...
पनवेलवैभव /  दि.25 (संजय कदम): आशिया खंडातील क्रमांक एक चे कळंबोली स्टील मार्केट समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. या विरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेने शुक्रवारी आंदोलन केले. या निमित्ताने एक दिवसीय लाक्षणिक बंदचे आवाहन पक्षाचे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
               यावेळी कळंबोली स्टील मार्केट परिसरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, कामोठे शहर प्रमुख सुनिल गोवारी, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब आदीसह मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग सहभागी झाला होता. यावेळी बोलताना संपक्र प्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगीतले की, कळंबोली स्टील मार्केटमध्ये सुविधांचा वाणवा आहे. रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट, पावसाळी गटारे याशिवाय धुळीचे साम्राज्य अशा अनेक समस्यांच्या चक्रव्यूहामध्ये मार्केट अडकले आहे. त्याचा त्रास व्यापारी, वाहतूकदार, माथाडी कामगार त्याचबरोबर इतर सर्वांना होत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने बाजार समितीला याबाबत 25 नोव्हेंबर चे अल्टिमेटम दिला होते. परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून बाजार समितीमधील मूलभूत सुविधांच्या न्याय हक्कासाठी आज आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी बाजार समिती अधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाची भेट घेऊन निवेदन स्विकारले तसेच त्यांच्या भावना शासना पर्यंत पोचहवून 1 महिन्याच्या आत समस्यांचे निवारण करु असे ठोस आश्वासन दिले आहे. 


फोटो: बाळासाहेबांची शिवसेने तर्फे करण्यात आलेले आंदोलन
Comments