बाळासाहेबांची शिवसेनेचे पनवेल महानगर संघटक मंगेश रानवडे व इम्तियाज शेख खारघर शहर संघटक यांना संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..
संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान


पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) :-  प्रदूषण, नागरी समस्या त्याचबरोबर विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या खारघर येथील मंगेश रानवडे यांच्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची महानगर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर इम्तियाज शेख  खारघर शहर संघटक पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
                    पनवेल मध्ये बाळासाहेबांची शिवसेना बऱ्यापैकी राजकीय जम बसवताना दिसत आहे. जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्यावर संपर्क आणि पक्ष संघटना वाढीची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सुरुवातीपासून शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या शेवाळे यांच्या बरोबरच महानगरप्रमुख ऍड प्रथमेश सोमण यांनाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक नोड निहाय पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न सुरू आहेत.यात प्रामुख्याने, मागील सात वर्षापासून, खारघर मध्ये  अनेक नागरी प्रश्न व मुद्धे मांडणारे व निवारण करणारे अशी ओळख असलेल्या मंगेश सुधाकर रानवडे यांना  महानगर संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.त्याचबरोबर  खारघर मध्ये  कार्यशील  असलेले  इम्तियाज शेख  यांना शहर संघटक म्हणून नियुक्त करण्यात आले. कळंबोली येथील बिमा संकुल मधील रामदास शेवाळे यांच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे आणि पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या आदेशानुसार या दोघाही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडून पक्ष संघटना वाढवतील असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला. तसेच रानवडे आणि शेख यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


फोटो- पनवेल संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मंगेश रानवडे व इम्तियाज शेख यांना देताना
Comments