नवी मुंबईच्या साई वर्ल्ड सिटीच्या पहिल्या टप्प्याचे शानदार हस्तांतरण...



विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दिल्या मनीष भातिजांना शुभेच्छा

८०० सदनिकांचे हस्तांतरण तर नव्या सदनिकांचे बुकिंग

पनवेलची ३२ एकरची मेगा टाउनशिप आणि मेगा सेलिब्रेशन

पनवेल / नवी मुंबई

पॅराडाईज ग्रुप साई वर्ल्ड सिटी फेज 'वन'च्या यशस्वी पूर्ततेनंतर ८०० भाग्यवान रहिवाशांसाठी चावी-हँडओव्हर समारंभ साजरा करण्यासाठी २ दिवसीय महोत्सवाचे आयोजन पळस्पे फाटा येथील टुमदार उभ्या राहिलेल्या साई वर्ल्ड सिटीमध्ये ०५ आणि ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडला.... यावेळी राजकीय, सांस्कृतिक, शासकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून पॅराडाइज ग्रुपचे संस्थापक तथा साईभक्त मनीष भातिजा यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी पॅराडाइज ग्रुपचे संस्थापक मनीष भातीजा यांनी बोलताना सांगितले की, पॅराडाइज ग्रुपमध्ये जीवन हे नेहमीच एक भव्य उत्सवासारखे असते. कारण प्रत्येकाला आनंद आणि आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम कारणे मिळणे गरजेचे आहे. याच नागरिकांच्या मनाला आनंद देणाऱ्या भावनेला पॅराडाईज ग्रुपने सत्यात उतरविले आहे. पनवेलमध्ये पळस्पे फाटा येथे ३२ एकर जागेत मेगा टाउनशिपचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा करण्यात आली. साई वर्ल्ड सिटीमधील अत्याधुनिक पद्धती, नवीन जनरेशन आणि कौटुंबिक जीवन यांचे जग भ्रमंतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प बनविला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

पॅराडाइज ग्रुपच्या माध्यमातून हस्तांतरण करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये ८०० कॉस्मो-लक्झरी घरे सुपूर्द करण्यात आली. तसेच पॅराडाईज ग्रुपने जगप्रसिद्ध असलेली ७ आश्चर्ये या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून येथील रहिवाशांना आश्चर्याचा धक्काच जणू दिला आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास रशियातील कलाकार आणि मुंबईतील प्रतिष्ठित कंपनीच्या कलाकारांना पाचारण करून मनोरंजनाचा खजिनाच ठेवला.  जागतिक जीवनशैलीचे मूर्त स्वरूप असलेल्या साई वर्ल्ड सिटीमध्ये विस्तृत हिरवे क्षेत्र, थीम असलेली लँडस्केपिंग आणि थीम असलेल्या जगात सुशोभित केलेल्या आरोग्य, मनोरंजन आणि विश्रांतीच्या जीवनशैलीच्या सुविधांसह समृद्ध क्लब जीवन याठिकाणी उभारण्यात आले आहे. पॅराडाईज ग्रुपच्या साई वर्ल्ड सिटीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याबद्दल मोठ्या दिमाखात साजरा जरी झाला असला तरी त्याच्या भव्य यशाची नोंद करण्यासाठी साई वर्ल्ड सिटी नवी मुंबईतील सर्वात मोठा ‘पॅराडाईज वर्ल्ड कार्निव्हल’ आयोजित केला.  ५ आणि ६ नोव्हेंबर २०२२ रोजी साजरा झालेल्या या दोन-दिवसीय मनोरंजन उत्सवाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. यावेळी मनीष भतिजा यांच्या सर्व सदस्यांनी संपूर्ण देशभरातील मान्यवरांना याठिकाणी आमंत्रित करून हा नवी मुंबईतील नाही तर देशभरातील अव्वल स्थानातील प्रकल्प असल्याची प्रचिती आली आहे. 

यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या जागतिक अनुभवासाठी अत्यंत रोमांचक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या उत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय नर्तकांच्या पॉवर-पॅक परफॉर्मन्ससह गायन कलाकार आणि जागतिक दर्जाचे वादक यांचा मिलाफ सुखदायक ठरला. भारत, रशियासह जगभरातील विशेष कलाकार या उत्सवामध्ये आपली कला सादर करीत होते तर मुलांचे मनोरंजन करण्यासाठी खास मनोरंजक प्ले झोन उपलब्ध करण्यात आला. या उत्सवामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार विजय तळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल आदींसह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती लाभली.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image