लोक अदालत दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याने पटकावले सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक...
 सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक..

पनवेल वैभव /  दि.१५ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस आयुक्त अंतर्गत परिमंडळ 2 मध्ये लोक अदालत दरम्यान सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक पनवेल शहर पोलीस ठाणे यांनी पटकावले आहे. 
पनवेल शहर पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे समन्स व वॉरंट विभागाचे अंमलदार पोलीस हवालदार युवराज येळे, पोलीस हवालदार रजनीकांत पगारे, पोलीस नाईक नितीन कुंभार, पोलीस नाईक नंदकुमार आढारी यांनी आतापर्यंत विविध गुन्ह्या संदर्भात बजावलेल्या समन्स व वारंट यातून केलेल्या कामाचे कौतुक वरिष्ठ पातळीपर्यंत करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांचा नुकताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  
फोटो : लोक अदालत दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याने पटकावले सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक
Comments