पोलीस पाटील व सरपंचाची बैठक संपन्न..
पनवेल / दि.२४ (संजय कदम) : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली आज बैठक पार पडली. यावेळी आवश्यक त्या सूचना कादबाने यांनी उपस्थितांना दिल्या.
या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक शिंदे, गुप्त विभागाचे अधिकारी संजय धारेराव आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना वपोनि विजय कादबाने यांनी उपस्थितांना सांगितले की, निवडणूक आचारसंहिताच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, धार्मिक मतभेद वाढतील किंवा तणाव निर्माण होईल असे कोणतेही काम करू देवू नये, ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही बेकायदेशीर घटना घडत असतील तर पोलीस ठाणे येथे तात्काळ माहिती द्यावी, प्रस्तावित सभेसाठी ध्वनीक्षेपणाचा वापर करण्यासाठी आणि अशा इतर कोणत्याही विषयासाठी वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक आहे, निवडणुकीकरिता उभे असलेले उमेदवार यांनी ज्या प्रभागातून निवडणूक लढवणार आहे त्या प्रभागातच प्रचार करावा इतर प्रभागात जाऊन प्रचार करणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी, मंदिर, मज्जित, दर्गा, चर्च, गुरुद्वार, किंवा इतर कोणते प्रार्थना स्थळ याचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून वापर केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, सर्व ग्रामपंचायत यांनी गावांमध्ये सीसीटीव्ही बसवून घ्यावेत याबाबत मार्गदर्शन केले, मतदाराला पैशाचे किंवा अनेक कशाचेही प्रलोभन दाखवत असतील तर तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, यासारख्या सूचना यावेळी देण्यात आल्या तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करण्यात आले.
फोटो: पनवेल शहर पोलीस ठाणे बैठक