संयुक्त विद्यमाने 'दीपोत्सवाचे' आयोजन...
पनवेल / (अनिल कुरघोडे) : - श्री रामेश्वर महादेव देवस्थान व जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 'दीपोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन श्री रामेश्वर महादेव मंदिर, वीर सावरकर चौक , पनवेल येथे करण्यात आले आहे.
सदर 'दीपोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि . ७/११/२०२२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता करण्यात आले आहे, तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे विनंतीयुक्त आवाहन मंदिराचे अध्यक्ष उमेश बाळकृष्ण इनामदार ( उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य- भाजपा.) व जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा मा.नगरसेवक नितीन जयराम पाटील यांनी केले आहे.