अज्ञात चोरटयांनी केलेल्या घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास ...
अज्ञात चोरटयांनी केलेल्या घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास 


पनवेल / दि. १० ( संजय कदम  ) :  बंद रूमच्या दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडून बेडरूममधील  कपाटात ठेवलेले लाखो रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अशा मिळून जवळपास ३,८९,०००/- किमतीचा  ऐवज चोरून नेल्याची घटना पनवेल शहरातील लोखंडी पाडा  येथे घडली आहे . 
                      गीतांजली रासम ( वय ६५ ) रा. श्री सहयोग को. ऑप  सोसायटी रूम नंबर २१० या बंद रूमच्या दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडून बेडरूममधील  कपाटात ठेवलेले लाखो रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अशा मिळून जवळपास ३,८९,०००/- किमतीचा  ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे . याबातची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments